Pimpri : व्यावसायिकांकडे खंडणी मागणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : रिव्हर रोड, पिंपरी येथील व्यावसायिकांकडे प्रत्येक महिन्याला हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri) हा प्रकार रविवारी (दि. 7) रात्री साडेनऊ वाजता घडला.
गणेश शिरसाठ (वय 30, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप अशोककुमार मोटवानी (वय 37, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली.(Pimpri) हप्ता न दिल्यास धंदा करू देणार नाही, अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या अन्य दोन दुकानांमध्ये जाऊन आरोपीने हप्ता देण्याची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.