Pimpri : तोडफोड प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज  – टेम्पो पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एक टोळक्‍याने सुरुवातीला एका टेम्पोची व मध्यरात्री दोन वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीतील खराळवाडी परिसरात शुक्रवारी (दि. 6) रात्री घडली.

अभिजित माणिक मोरे (वय 30, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी शनिवारी (दि. 7) पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्यादी दिली आहे. जावेद शाबीर सय्यद (वय 25), भावड्या धोत्रे (वय 27), जैद (वय 23, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून आमच्याकडे रागाने का बघतो, या कारणावरून कोयत्याने मारहाण केली. तसेच मोरे यांच्या टेम्पोची काच फोडून नुकसान केले.

दुसऱ्या घटनेत नाझीर मेहमूद पठाण (वय 30, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जैद शेख (वय 20), शारिक सय्यद (वय 20), जावेद सय्यद (वय 25), हरिश ऊर्फ भावड्या धोत्रे (वय 23, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी), शानू सय्यद (वय 23), निखिल राजमाने (वय 20, दोघेही रा. निगडी) व इतर तिघेजण (नाव, पत्ता माहिती नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी आपसांत संगनमत करून शनिवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास गांधीनगर परिसरातील एक टेम्पो व मोटार यांची कोयते, रॉड व लाकडी दांडक्‍याने तोडफोड करीत शिवीगाळ करीत दहा हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.