-MPC-TOP-MOST-BANNER-I

Wakad News : इस्टर संडेला चर्चमध्ये गर्दी केल्याप्रकरणी चर्चच्या फादर विरोधात गुन्हा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ख्रिस्ती बांधवांचा सण असलेल्या इस्टर संडे या दिवशी (रविवार, दि. 4) कोरोना काळात चर्चमध्ये गर्दी केल्याप्रकरणी चर्चच्या फादर आणि त्यांच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फादर पॉल डेव्हिड सिल्वे व त्याच्या इतर सहका-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई विठ्ठल सुरनर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवाडेनगर, काळेवाडी येथे जीजस लॉर्ड मिनिस्टरी चर्च आहे. त्या चर्चमध्ये आरोपी फादर आणि त्याच्या सहका-यांनी इस्टर संडेच्या दिवशी लोकांची गर्दी केली. कोरोना साथीचा काळ सुरु असल्याने सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असून शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना साथरोग पसरविण्यास पोषक वातावरण निर्माण केल्याबाबत फादर आणि इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.