Wakad : प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने प्रियकराविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – सोशल मीडियातून ओळख झालेल्या प्रेयसीच्या संमतीने तिच्याशी शरीरसंबंध केले. दरम्यान तिच्या नकळत तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. यावरून प्रेयसीने प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना बावधन काळेवाडी येथे 2016 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी पीडित प्रेयसीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पंकज रामचंद्र माने (वय 38, रा. सातारा) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा सातारा येथील आहे. त्याची आणि पीडित तरुणीची लींकडइन या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यातूनच मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडित तरुणीच्या संमतीने पंकज याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. दरम्यान त्याने तरुणीच्या नकळत तिचे अश्लील व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ पंकज याने तरुणीच्या मित्र-मैत्रिणींच्या व्हाट्स अप आणि फेसबुकवर पाठवले. तसेच आरोपी पंकज याने ‘मी माझ्या जीवाचे बरे-वाईट करून तुला अडकवीण’ अशी धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.