BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड काढणार्‍यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलगी शाळेत जाताना तिचा पाठलाग करून ‘तुझे नाव काय आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला खूप आवडतेस,  तू मला फोनवर बोलत’ नसल्याचे म्हणत मारण्याची धमकी दिली. ही घटना सप्टेंबर 2018 ते 4 जुलै 2019 या कालावधीत नखातेनगर येथे घडली.

याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम जनार्दन नखाते (रा. नम्रता कॉलनी, नखातेनगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेत जाताना आरोपी शुभम वारंवार तिचा पाठलाग करत होता. शुभमने पीडितेला ‘तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणत तिचा पाठलाग केला. मुलीने ‘तू माझा पाठलाग करु नकोस, मला फोन करु नको, असे सांगूनही आरोपी तिचा पाठलाग करत होता.  मुलगी भेटली नाही म्हणून शिवीगाळ करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे अधिक तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.