Dehu road : सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला थांबून वेश्या व्यवसायासाठी अश्लील हावभाव करणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Dehu road)ही कारवाई रविवारी (दि. 27) दुपारी देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर किवळे येथे करण्यात आली.

समाजसेवक विकास दत्ता घोरपडे (वय 23, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयातील प्रणव शेलार, ध्रुव घर्डले प्रथम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर तीन महिला रस्त्याच्या बाजूला थांबून वेश्या व्यवसायासाठी अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.(Dehu road) त्यानुसार पोलिसांनी तीन महिलांवर गुन्हा दाखल केला. या महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातवारे करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.