Pimpri : क्रिकेट बेटिंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका वेबसाईटवरून चालु क्रिकेट मॅचचा (Pimpri) भाव पहात मॅचवर बेटींग लावणाऱ्या दोघां विरोधात पिंपरी पोलीस गुन्हा दाखल केला आहे. हि करावाई गुन्हे शाखा युनीट दोन यांनी 9 मे रोजी रात्री पिंपरीतील प्रित अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये केली.
याप्रकरणी बुधवारी (दि.10) सनी प्रेमचंद गुरुनानी (वय 33) व सचिन सुदाम हासनदासानी (दोघे रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखा युनीट दोनचे पोलीस नाईक शिवाजी मुंढे यांनी फिर्याद दिली आहे.
Chinchwad : मोहननगर, रामनगर, विद्यानगर, काळभोरनगर परिसरात विजेचा लपंडाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी May3210या आयडीचा वापर करुन T20WorldExchange.com या वेब साईटवरून चालु क्रिकेट मॅचचा भाव पाहुन बेटींग लावली.(Pimpri) यावेळी पोलिसांनी ठापा टाकत त्यांच्यावर कारवाई केली. याचा पुढिल तपास गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.