Pune News : दुकानदाराकडे खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा

0

एमपीसी न्यूजदुकानदाराकडे खंडणीची मागणी करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.20) बोपखेल या ठिकाणी घडली

 

याप्रकरणी विरेद्रसिंह विक्रमसिंह कतनोरिया (वय 20, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत जोगदंड व संतोष गिरी (दोघेही रा. बोपखेल, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विरेद्रसिंह यांचे बोपखेल येथे ‘दशमेश एंटरप्रायजेज’ या नावाने दुकान आहे. शुक्रवारी आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात घुसून आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून विरेद्रसिंह यांच्या कडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. दुकानदाराने नकार दिल्याने आरोपींनी त्यांना मारहाण केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III