Hinjawadi : हॉटेल जाळल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा; 17 लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज – हॉटेल जाळल्याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हॉटेलचे 17 लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना हिंजवडी येथे 26 जानेवारी रोजी घडली.

उद्धव लिंबाजी झोडगे (वय 40, रा. मोरे चाळ, लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी रविवारी (दि. 23) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी मध्यरात्री एक ते सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्‍तीने फिर्यादी यांचे हॉटेल गिस्टो बिस्टो ऍण्ड लाऊड हे कशाच्यातरी सहाय्याने जाळले. यामध्ये हॉटेलच्या बँक्वेट हॉलमधील एसी, फर्निचर, पीओपी, प्रोजेक्टर, टेबल, खुर्ची, काउंटरचे एकूण 17 लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.