Crime News : किरकोळ कारणावरून एकाला टोळक्याकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – बांधकामाचे साहित्य आमच्या कडून का खरेदी केले नाही याचा राग मनात धरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एकाला (Crime News) दगड लोखंडी रॉडने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खेड येथील भोसे गावात  गुरुवारी (दि.2) घडली.

याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.3) फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी नंदु सखाराम लोणारी, सखाराम विठ्ठल लोणारी व संतोष महादु गांडेकर यांना अटक केली असून बबलु उर्फ चंद्रशेखर सखाराम लोणारी, कृष्णा खंडू  अरगडे व इतर अळकी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये नोकरी लावतो म्हणत पावणे अकरा लाखांची फसवणूक करणारे गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आमच्याकडून बांधकामाचे साहित्य का घेतले नाही याचा राग मनात धरून फिर्यादी यांचे दिर नवनाथ किसन गांडेकर यांना शेतातून उस वाहतूक करत असताना अडवले व इथून वाहतूक करायची नाही म्हणत दगडाने, लोखंडी रॉडने, काठीने मारहाण केली.

तसेच कोयत्या सारख्या हत्याराने फिर्यादी यांचे चुलसत सासरे तुळशीराम याच्या डोक्यात वार करत आज कोणालाच जिवंत सोडायचे (Crime News) नाही म्हणून गंभीर जखमी केले. चाकण पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.