Bhosari : थंड चहा दिल्यावरून पतीची पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – थंड चहा दिल्याच्या कारणावरून पटीने पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास खंडेवस्ती झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

याप्रकरणी पत्नी कविता महेंद्र भालेराव (वय 30, रा. खंडेवस्ती झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती महेंद्र भीमराव भालेराव (वय 32) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महेंद्र याने पत्नी कविता यांना चहा मागितला. कविता यांनी चहा आणून दिला. मात्र तो चहा थंड होता. यामुळे महेंद याने चिडून शिवीगाळ केली व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच कविता घराबाहेर जात असताना महेंद्र याने कठीण वस्तूने त्यांना मारले. यामध्ये कविता जखमी झाल्या. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.