Bhosari : पगार वाटप करताना सुपरवायझरला मारहाण

440

एमपीसी न्यूज – कामगारांचा पगार वाटप करीत असताना एका अनोळखी इसमाने सुपरवायझरला मारहाण करून समोर ठेवलेली रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ही घटना भोसरी येथील लांडेवाडी येथे सोमवारी (दि. 5) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

HB_POST_INPOST_R_A

मोनाली विठोबा काकडे (वय 24, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काकडे ‘आरओ वर्क’ या कंपनीत काम करीत असताना येथील कामगारांनी त्यांच्याकडे पूर्ण पगाराची मागणी केली. या मागणीनंतर त्यांनी अर्धा पगार देण्याचे मान्य करून सुपरवायझर लक्ष्मण राऊत यांना कामगारांना पगार देण्यास सांगितले. राऊत पगार वाटप करीत असताना त्याठिकाणी आलेल्या अनोळखी इसमाने त्यांना मारहाण करून त्यांच्या समोर ठेवलेली रोख रक्कम घेऊन पोबारा केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: