Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणास मारहाण केली. तसेच त्याच्या दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी सकाळी यमुनानगर, निगडी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

मुकेश चौधरी (वय-25, रा. यमुनानगर, निगडी) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल सुदास साळवे (वय-27, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी साळवे हे आपल्या दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची दुचाकी रस्त्यात अडवून फिर्यादी साळवे यांना लाकडी बॅटने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड केली. सहाय्यक निरीक्षक प्रशांत आरदवाड अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.