Pune :  गाडी अडवून चोरी करणा-या दोघांना 24 तासांच्या आत केले अटक

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणा-या गाड्यांचा गाडीने पाठलाग करून गाडी अडवून मारहाण करून चो-या करणा-या दोघांना 24 तासांच्या आतच पोलिसांनी जेरबंद केले आहे.

याप्रकरणी हेमंत तेलमोरे  यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत तेलमोरे हे रविवारी (दि.18) आपल्या चारचाकीतून कुटुंबियांसह सासवडहून पुण्याकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून दोघेजण त्यांच्या गाडीने पाठलाग करत आले आणि त्यांनी पवारवाडी जवळ गाडी आडवी मारून हेमंत तेलमोरे यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले होते.याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी यातील आरोपींचा शोध घेऊन अवघ्या 24 तासातच त्यांना गाडीसह ताब्यात घेऊन जेरबंद केले.आरोपी हे वडकी नाला परिसरातील रहिवासी आहेत.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले , उप विभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  उप निरीक्षक सावंत, पोलीस हवालदार चांदगुडे ,पोलीस हवालदार कुंडलिक, पोलीस नाईक ज्योतिबा भोसले, पोलीस कर्मचारी विक्रांत भोर ,पोलीस  कर्मचारी  खाडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.