Crime News : सुनेचे मासिक पाळीवेळी रक्त विकण्याचा किळसवाणा प्रकार; चंद्रकांत पाटील यांनी घेतली दखल

एमपीसी न्यूज : एकीकडे भारत विकासाच्या दृष्टीने पाऊल (Crime News) ठेवताना वैज्ञानिक प्रयोग करत असताना मात्र महाराष्ट्रात ग्रामीण भागात जादूटोण्याच्या नावाखाली अत्यंत निंदनीय किळसवाना प्रकार घडला आहे. बीडमध्ये एका विवाहित तरुणीचे मासिक पाळीवेळी जबरदस्ती रक्त विकण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार घडला. यावर आता पुण्यात गुन्हा दाखल होऊन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जितकी जास्त कलमे लावता येतील तेवढी लावा असे, ग्रामीण पोलिसांना निर्देश दिले आहेत.

या प्रकारावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील एका महिलेचे सासरच्या लोकांनी मासिक पाळीवेळी एक अत्यंत विचित्र प्रकार केला आहे. ज्याबद्दल बोलावेही वाटत नाही. एकीकडे विज्ञानयुग सुरू असताना; समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. या प्रकारामध्ये मी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एसपी सोबत बोलून जेवढी कलमे लावता येत आहेत; तेव्हढी लावा. अशा प्रकारच्या घटनांमध्ये लोकांना कायद्याची भीती राहिली नाही, ती वाटावी यासाठी कार्यवाही करण्याचे एसपी यांना सांगितले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय आहे नेमकी घटना?

बीड जिल्ह्यात एका 27 वर्षीय विवाहित तरुणीला बांधून तिचे मासिक पाळीवेळी रक्त घेऊन 50 हजार रुपयांना जादूटोण्यासाठी विकले. त्यानंतर (Crime News) तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार तीने आपल्या आई वडिलांना सांगितल्यावर. ती पुण्यातील विश्रांतवाडी येथे आपल्या माहेरी आली आणि तीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर आणि आणखी एका व्यक्तीवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 2019 पासून सुरु होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.