Urshe Crime News: पोलीस अधिका-यांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडने दुचाकीवर ट्रीपल सीट जाणा-याने पोलिसांशी उद्धटपणे वर्तन केले. अपशब्द वापरत शिवीगाळ केली. ही घटना शुक्रवारी (दि.27) उर्से टोलनाक्यावर घडली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजु लुमाजी भालचिम (वय 55) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हरेश हरीभाऊ भरणे (वय 40, रा. येलघोल, ता. मावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

आरोपी नरेश हा मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडने दुचाकीवरुन ट्रीपल सीट चालला होता. त्याला पोलीस उपनिरीक्षक राजु भालचिम यांनी थांबण्याचा इशारा केला. आरोपीने त्याकडे दुर्लक्ष करत अंगावर गेला. पोलिसांशी अरेरावीचे, उद्धटपणाचे वर्तन केले. अपशब्द वापरत शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणला. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.