Chinchwad Crime News : भटक्या श्वानाला धडक देऊन ठार करणा-या कार चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणा-या भटक्या श्वानाला धडक देऊन ठार करणा-या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम्पायर ईस्टेट, चिंचवड या ठिकाणी गुरूवारी (दि.17) हा अपघात झाला. 

याप्रकरणी वंदना अशोक मिश्रा (वय 55, रा एम्पायर ईस्टेट, चिंचवड ) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील संत मदर टेरेसा पुलाखालून तीन ते चार भटकी श्वाने रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या एका सफेद कारने त्यातील एका श्वानाला जोराची दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. दाखल तक्ररारी नुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक दळवी करत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.