Hinjawadi : रिलेशन ठेवण्याची धमकी देणाऱ्या फेसबुक फ्रेंडवर गुन्हा

एमपीसी न्यूज – फेसबुकवर झालेल्या मित्राने तरुणीला आपल्या सोबत रिलेशन ठेवण्यासाठी धमकी दिली. तसेच तिला रस्त्यात अडवून रिलेशन न ठेवल्यास स्वतःचे काहीही करून घेण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. ही घटना 15 सप्टेंबर रोजी सुसगाव येथे घडली.
प्रताप शिंदे (रा. ठाणे शहर) असे गुन्हा दाखल झालेल्या फेसबुक फ्रेंडचे नाव आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रताप आणि फिर्यादी तरुणी यांची फेसबुकवरून ओळख झाली. यावरून प्रताप याने तरुणीशी वारंवार रिलेशन ठेवण्याची मागणी केली. तरुणीने रिलेशन न ठेवल्यास स्वतःचे काहीही करून घेईल, अशी धमकी दिली. तसेच प्रताप याने तरुणीचा पाठलाग करून सुसरोड येथील किर्ती गार्डन समोर तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच रिलेशन न ठेवल्यास स्वतःचे काहीही करून घेईल, अशी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.