Dapodi : दुचाकी पेटविणाऱ्या दोघांवर गुन्हा

Crime on two who set the bike on fire.

एमपीसी न्यूज – नुकसान करण्याच्या उद्देशाने दुचाकी पेटवून देणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री पावणे दोनच्या सुमारास जयभिमनगर, दापोडी येथे घडली.

संतोष दत्तात्रय कांबळे (रा. गेणु कामळे चाळ, जयभिमनगर, दापोडी) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बबलू बबन सोनवणे (वय 35) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फिर्यादी यांनी त्यांची (एम एच 14 / एफ यू 4280) ही मोपेड दुचाकी घरासमोर पार्क केली होती. रात्री पावणे दोनच्या सुमारास आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्या दुचाकीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने त्यांची दुचाकी पेटवून दिली.

यामध्ये दुचाकीचे एक हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.