Wakad : बनावट साहित्य विक्रीप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या साहित्यावर नामांकित कंपनीचे बनावट लेबल लावून साहित्य विक्री केल्याप्रकरणी एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार थेरगाव येथील आनंद ऑटोमोबाईल्स या दुकानात घडला.

आनंद रतनलाल अगरवाल (वय 37, रा. पिंपरी), असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी रेवणनाथ विष्णू केकाण (वय 37, रा. हडपसर), यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंद यांचे थेरगाव येथील 16 नंबर बस स्टॉपजवळ आनंद ऑटो मोबाईल्स हे दुकान आहे. त्यांनी दुकानात 12 ऑइल फिल्टर, चार फ्रस्ट व्हील बेरिंग, एक वॉटर एल्बो, एअर फिल्टर असे साहित्य हुंडाई कंपनीचे बनावट लेबल लावून विक्री केली. याबाबत केकाण यांनी 10 हजार 516 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.