Pimpri News : विनाकारण फिरणा-यांवर गुन्हे; गृहविलगीकरणातील रुग्णांनाही इशारा

एमपीसी न्यूज – होम आयसोलेशनमधील रुग्णांची तपासणी, काँन्टँक्ट ट्रेसिंग, कॉल सेंटरव्दारे विचारपूस, आवश्यकतेनूसार डॉक्टरांचा सल्ला दिला जात आहे. ही यंत्रणा अधिक प्रभावी राबविण्यासाठी रुग्णांच्या सोयी – सुविधा, त्यांचावर प्रत्यक्ष लक्ष आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी फिल्ड सर्वेलन्स टीम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होम आयसोलेशनमधील रुग्ण अथवा कोणीही व्यक्ती विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने रुग्णनिहाय तपासणी केंद्र सुरु केले आहेत. त्या केंद्रावर टेस्ट झाल्यानंतर प्राधान्याने 22 ते 44 वयोगटातील पॉझिटिव्ह रुग्णांना महापालिकेच्या कोविड सेंटर आणि संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णालय प्रमुखांच्या शिफारशीने दाखल केले जाणार आहे.

सरकारच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार, सूक्ष्म (माइल्ड) आणि लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी स्वतंत्र खोली, टॉयलेट आणि बाथरुम असल्याची खातरजमा केली जाणार आहे. ते असेल तर त्यांच्या हातावरती होम आयसोलेशनचा शिक्का मारुन होम आयसोलेशनची परवानगी दिली जाणार आहे.उर्वरित पॉझिटिव्ह रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षात काटाक्षाने भरती केले जाणार आहे.

यासाठी पीएमपीएल बस उपलब्ध आहेत. तसेच, कटेन्मेंट झोन तयार करणे, अशा झोनला स्टिकर लावणे, सोसायट्यांबाहेर फलक लावणे, 14 दिवसानंतर तो झोन फ्री करणे अशी कोम पथकाने करायची आहेत. यासाठी सोसायट्यांचे सचिव आणि अध्यक्षांची मदत घेतली जाणार आहे. सोसायटीतील पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरणार नाहीत याबाबत त्यांना सूचना आणि ताकीद देणे, त्यांच्या कार्यक्षेत्रात रिक्षाव्दारे आणि आरोग्य विभागाच्या कचरा वेचक गाड्यांव्दारे जनजागृती केली जाणार आहे.

फिल्ड सर्वेलन्स टीममध्ये पीएमपीएल चे कर्मचारी आणि महापालिकेतील 496 शिक्षकांच्या रुग्णनिहाय नेमणुका केल्या जाणार आहेत. नियुक्तीपासून एक महिन्यापासून या नेमणूका असतील. त्यांनी संबंधित रुग्णालयप्रमुख, वैद्यकीय अधिका-यांनी रुग्णालय स्तरावर कामकाजाची परिपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण देऊन कामकाज करुन घ्यायचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.