Hinjawadi : संस्थेच्या गोपनीय माहितीच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – संस्थेची गोपनीय माहिती पाठवून कंपनीचे नुकसान केल्या प्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे घडली.

शुभम मेहरोत्रा (सध्या रा. सुतारवाडी, लिंक रोड, पाषण, पुणे) आणि रतनदीप सलुजा (रा. बावधन, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुरज विमल शर्मा (वय 36, रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मे 2017 ते 6 नाव्हेंबर 2019 या कालावधीत रामाचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आरआयआयएम) बावधन येथे घडली. आरोपी सलुजा याने शिफारस केल्याने फिर्यादी शर्मा यांनी आरोपी शुभम याला नोकरीवर घेतले. शुभम याने कंपनीने दिलेल्या ई-मेल आयडीवरून स्वतःच्या ई-मेल आयडीवर शर्मा यांच्या कंपनीची गोपनीय माहिती घेतली. आरोपी सलुजा याने स्वतःच्या फायद्याकरिता जेनेसीस बिजनेस स्कूल सुरू केले.

आरोपी शुभम याने पाठविलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फिर्यादी शर्मा यांच्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत फिर्यादी यांच्या विरोधात भडकविले. तसेच संस्थेच्या अधिकृत मेलवरून पाठविलेल्या गोपनिय मेलचा उपयोग करून विद्यार्थ्यांना नोकरी व ऍडमिशनसाठी मेसेज केले. तसेच समक्ष भेटून कॉलेजची बदनामी करीत आर्थिक नुकसानही केले. तसेच रतन सलुजा याने फोनवरून शर्मा यांना धमकावत शिवीगाळही केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.