BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : बनावट पीयूसी देणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – वाहनाची तपासणी न करता परस्पर पीयूसी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथील सरहान पेट्रोल पंपावर घडली.

अमर रामचंद्र कोरके (रा. वाघिरे चाळ, नेहरूनगर, पिंपरी) आणि बाळू राठोड (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रवीण बप्पासाहेब खेडकर (वय 40, रा. बालेवाडी, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आरटीओ कार्यालयात कामाला आहेत. 14 सप्टेंबर 2019 रोजी आरोपींनी आपसात संगनमत करून एम एच 49 / ए ई 2700 हे वाहन प्रत्यक्ष नसताना पीयूसी प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3