Pune News : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 85 नागरिकांवर गुन्हे दाखल

0

एमपीसी न्यूज : पुण्यात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यांचा आता पोलिसांकडून रात्रीचा संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसात शहरात विनाकारण फिरणाऱ्या 85 नागरिकांवर संचारबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. 

_MPC_DIR_MPU_II

संचारबंदी लागू केली असताना सुरुवातीचे दोन दिवस पोलिसांनी रात्रीच्या वेळी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना समजावून सांगितले. नंतर आता 5 एप्रिल पासून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री 21 जणांवर तर मंगळवारी रात्री 64 अशा एकूण 85 जणांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 188 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याशिवाय पोलिसांनी पाच आणि सहा एप्रिल तब्बल 2193 जणांवर विना मास्क आढळल्याप्रकरणी कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत विना मास्क फिरणाऱ्या 2 लाख 81 हजार 288 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 13 कोटी 68 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment