BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार सराईतांना अटक

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई 

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक केली. ही कारवाई चाकण येथे मंगळवारी (23) करण्यात आली. 

सागर राजेंद्र ठाकुर (रा. एकतानगर, चाकण) व  दत्ता गुलाग सातपुते (रा. खेड) अशी अटक आरोपींची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चाकण पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातील एकाला अटक  करण्यात आली होती. मात्र दोघेजण फरार होते. हे दोघे फरार आरोपी चाकण आंबेठाण चौकात असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार रविंद्र राठोड व पोलीस हवालदार दीपक खरात यांना मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून दोघांना अटक केली.  सागर आणि दत्ता हे दोघेही सराईत गुन्हेगार असून दोघांवरही जबरी चोरी आणि खूनासारखे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

HB_POST_END_FTR-A4

.