Hinjwadi : पिस्तूल बाळगणारा गजाआड

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल व एक राऊंड बाळगणार्‍याला हिंजवडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. 

सागर जानकिप्रसाद साहू (वय-28, रा. लिंकरोड, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विवेक रमेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

एक तरुण हिंजवडीतील राजयोग हॉटेल समोर थांबला असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल, एक राऊंड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्तूल, एक राऊंड जप्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.