Pune News : गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

एमपीसी न्यूज : दहशत पसरविण्यासाठी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातील एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. परवेज इक्बाल पटवेकर (वय 23, रा. 280, गुरुवार पेठ, बोंबीलवाडा पुणे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचारी सागर केकाण व फईम सैय्यद यांना गुप्त बातमीदाराव्दारे सराईत गुन्हेगार परवेज इक्बाल पटवेकर हा पिस्टल घेऊन गंज पेठेतील एका हॉटेलमध्ये बसला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर खडक पोलिसांचा तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी गंज पेठ परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडती कमरेला लटकवलेले एक गावठी पिस्तूल आणि आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. याची किंमत 32 रुपये इतकी आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

परवेज पटवेकर हा खडक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याविरोधात यापूर्वी खुन, खंडणी, घातक शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी सहा. पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे, पोलीस अमंलदार अजिज बेग, फईम सय्यद, अनिकेत बाबर, गणेश सातपुते, संदिप पाटील, सागर केकाण, अमेय रसाळ, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, रवी लोखंडे, योगेश जाधव, यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.