Pune : सराईत आरोपीस अटक, गावठी कट्टा जप्त

एमपीसी न्यूज – सराईत आरोपीला गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी (दि.16) पौड रोड, वनाज कंपनीजवळ केली.  

गोविंद प्रकाश पसलवाड (वय 20, रा. उरावडे, ता. मुळशी मूळ रा. सरसमगाव, ता. हिमायतनगर, जि. नांदेड), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार पांडुरंग वांजळे यांना सराईत गुन्हेगार गोविंद पौड रोडवर आहे. त्याच्याजवळ गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पौड रोडवर वनाज कंपनीजवळ सापळा रचून गोविंदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. हे पिस्टल त्याने विकण्यासाठी आणले होते. त्याच्यावर पौड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 307 अन्वये गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो फरार होता.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उप निरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी हनुमंत गायकवाड, धीरज भोर, रमेश गरुड, उदय काळभोर, महेश कदम, मनोज शिंदे, संतोष मते, शिवानंद बोले, फिरोज बागवान, अमोल पिलाने यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.