Pimpri: पालिकेत भंडा-या उधळणा-या 200 अज्ञातांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौर निवडीनंतर कार्यकर्त्यांना मुक्त हाताने भंडा-यांची उधळण केली होती. त्यातच पावसाचा शिडकावा झाल्याने भंडा-याचा चिखल होऊन चिखलावरुन पडल्याने 17 ते 18 जण जायबंदी झाले होते. याप्रकरणी भंडारा उधळणा-या 200 अज्ञातांवर पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महापालिकेच्या कर्मचा-याने फिर्याद दिली असून त्यानुसार 200 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीनंतर भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मुक्त हाताने भंडा-यांची उधळण केल्यामुळे पालिका भंडा-यात न्हाऊन गेली होती. यामुळे पालिकेसह सर्वत्र अस्वच्छता झाली होती. त्यामुळे पालिकेचे विद्रुपीकरण झाल्याची तक्रार पिंपरी ठाण्यात दिली होती. त्यानुसार 200 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.