Kothrud : सराईत गुन्हेगारास दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज – कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार साजन जगताप(वय 24,रा. कोथरूड) याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.

परीमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. साजन याच्यावर त्याच्या गुंड साथीदारांसह स्वतःजवळ घातक शस्त्र बाळगून खून करण्याचा प्रयत्न करणे, मारामारी करणे, आदी गंभीर गुन्हे आहेत. तसेच कोथरूड भागात त्याची दहशत असल्याने उपायुक्त मंगेश शिंदे यांनी साजन याला दोन मे दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तडीपार साजन कोठेही दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.