Pune : पुण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार निघाला वाहनचोर, चोरलेली 3 वाहने जप्त

Criminal on record in Pune, vehicle thief, 3 stolen vehicles seized खडकी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पुण्याच्या गुरुवार पेठेत राहणारा आणि खडकी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक उर्फ पप्पू पवार (वय 23) याला वाहन सुरक्षा पुण्यात खडकी पोलिसांनी अटक केली. त्याने चोरलेली एक चारचाकी आणि दोन दुचाकी अशी तीन वाहने जप्त केली आहेत. खडकी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शुक्रवार पेठेतून 2 जुलैच्या रात्री फोर्स कंपनीचा एक लाल रंगाचा टेम्पो चोरीला गेला होता. टेम्पो मालकाने याप्रकरणी खडकी पोलिसात तक्रार नोंदविली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना खडकी पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की अभिषेक उर्फ पप्पू पवार यानेच हा टेम्पो चोरी केला आहे. तसेच तो आता शुक्रवार पेठेतील एका गल्लीत थांबला आहे.

त्यानुसार खडकी पोलिसांचे एक तपास पथक घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी पप्पू पवार याला पकडून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत त्याने या टेम्पो सह आणखी दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरीची ही सर्व वाहने पोलिसांनी जप्त केली.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विश्रामबाग वाडा आणि खडकी पोलीस स्टेशन मध्ये जबरी चोरी आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.