Pune : क्रूरपणे बकरा कापल्यामुळे एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – क्रूरपणे बकरा कापल्यामुळे एका व्यक्तीच्या विरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री साडेबाराच्या दरम्यान एरंडवणा येथे घडली.

शेरू रहेमान खान, असे या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणा येथे राहणाऱ्या फिर्यादी या प्राणीमात्रांवर होणा-या अन्यायाबाबत काम करणा-या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत. बुधवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान एरंडवणा येथे आरोपीने त्याच्याजवळील बक-याला ओढत नेत त्याला क्रूरपणे वागणूक दिली. एवढेच नाहीतर बकरा मोठमोठ्याने ओरडत असतानासुद्धा त्याला कापले. घडलेला सर्व प्रकार असह्य झाल्याने फिर्यादी महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अलंकार पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.