India Corona Update : 1 कोटी लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

देशात 1.39 लाख सक्रिय रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीला सुरुवात करण्यात आली. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात आतापर्यंत 1 कोटी 1 लाख 88 हजार 007 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. देशात सध्या 1.39 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 09 लाख 63 हजार 394 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 06 लाख 67 हजार 741 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांत देशभरात 10 हजार 896 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 94 लाख 74 हजार 862 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 71 हजार 071 नमून्यांची तपासणी गुरुवारी (दि.18) करण्यात आली आहे.

 

सध्याच्या घडीला देशात 1 लाख 39 हजार 542 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 97 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 56 हजार 111 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.42 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.32 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.