Pimple Gurav : चक्क कावळयाने ऐकला तुकोबांचा अभंग 

The crow heard Tukoba's abhang

एमपीसी न्यूज –  एका जागी शांत बसून अगदी लक्ष देऊन कावळ्याने अभंग ऐकला, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण पिंपळे गुरवमधील सुरेश कंक यांच्या घरी हा दुर्मिळ योगायोग घडला आहे.

कवी सुरेश कंक हे नित्यनेमाने सकाळी आपल्या तुळशी वृंदावनाची पूजा करत असताना त्या ठिकाणी अचानक कावळा येऊन बसला.

कंक हे त्यावेळी तुकोबारायांचा ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा प्रसिद्ध अभंग म्हणत होते. हा अभंग पूर्ण होई पर्यंत कावळा जागचा हलला नाही.

कावळ्याने सगळा अभंग एका ठिकणी बसून ऐकला. विशेष म्हणजे कावळा ज्या फलकावर बसला होता त्या फलकावर माऊलींचे नाव लिहिले होते.

कंक यांच्या कुटुंबीयांनी हा अनोखा योगायोग मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

या प्रसंगाबद्दल बोलताना कंक म्हणाले की, कावळा शक्यतो एवढ्या जवळ कधीच येत नाही आणि आला तरी थोडी हालचाल झाली कि लगेच उडून जातो.

त्यामुळे हा प्रसंग म्हणजे ‘पैल तो गे काऊ कोकताहे, शगुन गे माये सांगता हे’ याची प्रचिती आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.