Pune : लॉकडाऊनमध्येही पाण्यासाठी गर्दी, तक्रारींकडे महापालिकेचे दुर्लक्ष : अतुल बहुले 

एमपीसी न्यूज – लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा  करण्यास सुरुवात  केली. मात्र,  सध्या मंतरवाडीत पाणी येते. परंतु, उरुळीत पाणी येत नाही. सध्या कोरोणाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइनने पाणी द्यावे, अशी मागणी भारिपचे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी  केली आहे. 

याबाबत त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र, या निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नाही.  उरुळीत सध्या  पाणी भरण्यासाठी टँकर जवळ मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी  होते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका नाकारण्यात येवू शकत नाही.

उरुळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये  खर्च पुणे महानगर पालीकेच्या वतिने करण्यात आलेला आहे. शिवाय तीन दशलक्ष लिटरची पाण्याची टाकिही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे. तरीही येथील नागरिकांचे पाण्याचे हाल सुरूच आहेत.

कचराडेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो.  त्या प्रमाणे ऊरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही. कोरोनामुळे सध्याची परिस्थिती  गंभीर आहे.  उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे. तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल  बहुले यांनी केला आहे.

या टॅंकरवर पाणी भरणे धोक्याचे आहे, यामुळे लोकांना  कोरोनाची  होवु शकते. त्वरित नलीकेद्वारे पाणी ग्रामस्थांना सुरु करणेत यावे. अन्यथा कायदेशीर सल्ला घेऊन सनदशीर आंदोलन करण्याचा इशारा बहुले यांनी दिला आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.