Pune News : क्रूरता ! गोठ्यात बांधलेल्या बैलाला गळफास देऊन केले ठार

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुरवंडी गावात गोठ्यात बांधलेल्या अडीच वर्षाच्या बैलाला अज्ञात व्यक्तीने गळफास देऊन ठार मारले आहे. या प्रकरणी अज्ञातां विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्यातील शेतकरी संदीप तोत्रे यांनी पंढरपूर येथून खिलार जातीचे दीड वर्ष वयाचे वासरु विकत आणले होते. त्याला चांगला खुराक दिल्याने बैल चांगला तरबेज आणि रुबाबदार दिसत होता. या बैलाला अनेकांनी चांगली किंमत देऊन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र संदिप तोत्रे यांनी बैलाची विक्री केली नाही.

मात्र बुधवारी रात्रीच्या सुमारास बैलाच्या गोठ्यातील खांबाला रस्सीच्या सहाय्याने क्रुरपणे गळफास देऊन ठार मारले आहे. मात्र तोत्रे यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे बैलाच्या हत्येनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. संदीप तोत्रे यांनी मंचर पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, अशा नराधम आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.