Crypto currency fraud : ऑनलाईन खोटे अॅग्रीमेंट करत 23 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेऊन ऑनलाईन खोटे अॅग्रीमेंट केले. क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास भाग पाडून 23 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली.(Crypto currency fraud) ही घटना 22 मे ते 1 जून या कालावधीत घडली.

प्रशांत रमेश सिंग (वय 39, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीसीएम इन्व्हेस्टमेन्ट ऍडव्हायझरी को लिमिटेड हॉंगकॉंग कंपनीचे ऍडव्हायजर म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tourism Day : पर्यटन म्हणजे निसर्ग जाणून घेण्याची संधी – धनंजय शेडबाळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने 18 मे रोजी फिर्यादींसोबत व्हाट्स अप द्वारे संपर्क केला. बीसीएम इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझरी को लिमिटेड, फायनान्शियल स्ट्रीट, हॉंगकॉंग या कंपनीच्या ऍडव्हायझरने व्हाट्स अप ग्रुप तयार केला. त्यात फिर्यादीस सामावून घेत त्यांच्याशी चॅट केले.(Crypto currency fraud) ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधत त्यांच्याशी ऑनलाईन अॅग्रीमेंट केले. त्या आधारे फिर्यादीस 23 लाख 10 हजार रुपयांची क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास आरोपीने भाग पाडले. याबाबत आपली फसवणूक होत असल्याचे फिर्यादीस समजले असता त्यांनी आरोपीला ऑनलाईन संपर्क केला. मात्र आरोपीने कोणताही रिप्लाय न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.