CS Exam Update: CS परिक्षा 18 ते 28 ऑगस्ट दरम्यान होणार, ICSI ने जाहीर केली तारीख

CS Exam Update: CS Exam will be held from 18th to 28th August, date announced by ICSIICSI या परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन क्रॅश कोर्सही चालवत आहे. याचे वर्ग 2 जुलैपर्यंत चालणार आहे.

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (ICSI) सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव, प्रोफेशनल प्रोग्राम आणि पोस्ट मेंबरशीप क्वॉलिफिकेशन परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकली आहे. सीएसची जून महिन्यातील परीक्षा लांबणीवर टाकत जुलै महिन्यात आयोजित केली जाण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे.

CS परिक्षा 18 ते 28 ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार आहे. ICSI या परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन क्रॅश कोर्सही चालवत आहे. याचे वर्ग 2 जुलैपर्यंत चालणार आहे. ICSI च्या विद्यावाहिनी कार्यक्रमांतर्गत हे वर्ग घेण्यात येत आहेत.

ICSI ने याबाबत ट्विटर वरुन माहिती दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

यापूर्वीही सीएस जून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 1 जून ते 10 जून दरम्यान या परीक्षा होणार होत्या. लॉकडाउन असतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते.

कंपनी सेक्रेटरी पदाच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येतात. यामध्ये फाऊंडेशन, एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनलचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.