Squash tournament : सीएसके आयस्क्वॉश करंडक’ 2022 खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे 29 जूनपासून आयोजन

एमपीसी न्यूज – आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमीतर्फे  ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ 2022 खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे (Squash tournament) आयोजन करण्यात आले आहे. ही 3 – स्टार एसआरएफआय राष्ट्रीय स्पर्धा 29 जून ते 3 जुलै या कालावधीमध्ये चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंढवा येथे होणार आहे. स्पर्धेमध्ये भारतातील 21 राज्यांतील 563 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

 

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमीचे संचालक असिफ सय्यद आणि मरीषा जिल्का यांनी सांगितले की, या वर्षी पहिल्यांदाच स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडियाची (एसआरएफआय) 3- स्टार अशा मानांकित राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान आम्हाला मिळत आहे, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्सचे संचालक संदीपदादा कोद्रे हे या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ असून त्यांच्या पाठींब्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणे शक्य होत आहे. स्पर्धेला योड्डा, एच 20, टर्नअराऊंड इंटनॅशनल क्लिनिक यांनी पाठींबा दिला आहे. भारतातील स्क्वॅश क्रिडा (Squash tournament) क्षेत्रातील मानांकित असलेले गौतम दास यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखेखाली ही स्पर्धा होणार आहे.

Rural Technology Diploma Course : विज्ञानाश्रमात ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम

 

या स्पर्धेत देशातील ज्युनिअर आणि वरीष्ठ गटातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, चैन्नई, कर्नाटक, गोवा, हरयाणा, केरळ, काश्मिर अशा 21 राज्यांमधील 563 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा मुले आणि मुली 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षाखालील ज्युनिअर गट, 35, 45, 55 वर्षावरील मास्टर्स गट आणि प्रोफेशनल गट अशा विविध गटांमध्ये खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत एकेरी गटात सामने होणार असून हे सामने बाद फेरी पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्व गटातील पहिल्या 8 विजेत्यांना करंडक आणि मेडल्स् देण्यात येणार आहेत.

 

 

असिफ सय्यद आणि मरीषा जिल्का यांनी पुढे सांगितले की,  ही राष्ट्रीय स्पर्धा पुण्यामध्ये आयोजित केल्यामुळे स्थानिक खेळाडूंना स्पर्धेमध्ये भाग घेण्याची सहज संधी उपलब्ध झाली आहे.  महाराष्ट्र राज्यातून 250 असे सर्वाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविलेला आहे. ही स्पर्धा स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्क्वॅश (Squash tournament)  रॅकेट्स असोसिएशन यांच्यामान्यतेखाली आयोजित केली जात आहे. आयस्क्वॅश अ‍ॅकॅडमीमध्ये संपूर्ण ग्लास स्क्वॅश कोर्ट उपलब्ध असून असे कोर्ट पुण्यासह देशामध्ये केवळ चैन्नई आणि मध्यप्रदेश येथेच उपलब्ध आहेत. स्पर्धेचे सामने आयस्क्वॅश अ‍ॅकॅडमीच्या 3 ग्लास बॅक एएसबी स्क्वॅश कोर्ट आणि एक संपूर्ण ग्लास स्क्वॅश कोर्टमध्ये खेळविण्यात येणार आहे.

 

स्पर्धेच्या पुरूष गटामध्ये जमाल शाकिब याला तर, महिला गटामध्ये सुनिता पटेल यांना स्पर्धेचे अग्रमानांकन देण्यात आले आहे. 13 वर्षाखालील मुलांच्या ज्युनिअर गटामध्ये आयस्क्वॅश अ‍ॅकॅडमीच्या हृधान शहा याला अग्रमानांकन तर, एस. सुब्रमण्यम याला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. मुलींमध्ये आरीका मिश्रा यांना अग्रमानांकन तर, आद्या बुधीया हिला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. आरीका मिश्रा हिने नुकतेच थायलंडमध्ये झालेल्या एशियन ज्युनिअर स्क्वॅश स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

 

19 वर्षाखालील गटामध्ये ओम सेमवाल याला अग्रमानांकन तर, आर्यन सिंग याला दुसरे मानांकन देण्यात आले आहे.  11 वर्षाखालील गटात अक्शत सिंघाल याला अग्रमानांकन तर, देवांश अगरवाल याला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. या गटाच्या मुलींच्या विभागात अनिका कलंकी हिला अग्रमानांकन तर, अनया गणेश हिला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. 15 वर्षाखालील मुलींच्या गटात आकांश्रा गुप्ता हिला अग्रमानांकन तर, रूद्रा सिंग हिला दुसरे मानांकन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.