CSK Suspend Team Doctor: भारत-चीन चकमकीबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या डॉक्टरची CSKने केली हकालपट्टी

CSK Suspend Team Doctor: CSK suspended team doctor after his tweet on india-china clashes सीएसकेच्या संघ व्यस्थापनाने याची दखल घेत मधू थॉटप्पिलील याची संघातून हक्कलपट्टी केली आहे. संघ व्यवस्थापनाने असे म्हटले आहे

एमपीसी न्यूज- भारत आणि चीन यांची लडाख येथील गलवान प्रदेशात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जावान शहीद झाले. या चकमकीबद्दल वादग्रस्त ट्विट करणाऱ्या चेन्नई सुपर किंगच्या संघ डॉक्टरची व्यवस्थापनाने हकालपट्टी केली आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशातील सीमा वाद पेटला असताना चेन्नई सुपर किंग या आयपीलएल संघाच्या डॉक्टरने वादग्रस्त ट्विट करून वाद ओढवून घेतला आहे.

मधू थॉटप्पिलील असे या डॉक्टरचे नाव असून त्याने ‘शहीद जवानांचे कॅफिन देशात आणताना त्यावर पीएम केअरचे स्टिकर लावणार की काय याबाबत उत्सुकता आहे’ असे वादग्रस्त ट्विट केले आहे.

सीएसकेच्या संघ व्यस्थापनाने याची दखल घेत मधू थॉटप्पिलील याची संघातून हक्कलपट्टी केली आहे. संघ व्यवस्थापनाने असे म्हटले आहे की, त्यांनी केलेल्या या ट्विटची गंभीर दखल घेतली असून त्यांची संघातून हक्कलपट्टी केली आहे. थॉटप्पिलील यांनी केलेल्या या ट्विटबद्दल संघाला खेद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.