Chakan News : मेदनकरवाडी जवळ अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई ; 26 लाखाचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटेकत

एमपीसी न्यूज – चाकण शिक्रापूर रोडवर मेदनकरवाडी, चाकण याठिकाणी अवैध दारू वाहतूक प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 26 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी (दि.17) सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.

युवराज दत्तात्रय पाटणे (वय 42, रा. बोरजाईनगर, चाकण), हनुमंत देवराम काची (वय 34, बागवान वस्ती, मरकळ, खेड), अक्षय मिलिंद गायकवाड (वय 24, रा. भोसे, खेड) व मल्लीनाथ दत्तात्रय कोळी (वय 28, रा. चाकण, खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देशी, विदेशी दारूची अवैध पद्धतीने वाहतूक करत असताना आढळून आले. त्यांना मेदनकरवाडी जवळून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 5.40 लाखांची पिकअप, 7.80 लाखाची चारचाकी, 5.20 लाखाची पिकअप आणि जवळपास आठ लाखाची देशी, विदेशी दारू असा एकूण 26.23 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.