Sangvi : महेश मंडळातर्फे समाजउत्पत्ती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – सांगवी परिसर महेश मंडळातर्फे समाजउतप्ती दिनानिमित नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी नगरसेविका शारदा सोनावणे, सुनील लोहिया, सतीश लोहिया,  सचिन मंत्री, निलेश अट्टल, सत्यनारायण बांगड, पंकज पंपालिया आदी उपस्थित होते.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस, एकल, युगल नृत्य व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांनी प्लास्टिकबंदी, पर्यावरण,  झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा भविष्य वाचवा आदी संदेश देत व्यक्तिमत्वाच्या वेशभूषा सादर केल्या. महिलांनी  समूह नृत्य, पर्यावरणाचा संदेश देत नृत्य सादर केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती बलदवा व दीपेश मालानी यांनी केले तर परीक्षक म्हणून विक्रांत देव्हारे, मोनिका पुरोहित यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, गणेश चरखा, गजानंद बिहाणी, पंकज टावरी, अभिषेक सदानी पद्मा लोहिया यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.