Talegaon : जुन्नर येथील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्रास सांस्कृतिक भवनचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – जुन्नर येथील शिवनेर प्रतिष्ठान संचलित राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्रास रोटरी क्लब ऑफ तळेगांव सिटीचे संस्थापक व मावळ तालुका खान क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष विलासराव काळोखे यांच्या वतीने सांस्कृतिक भवनचे लोकार्पण पार पडले.

मागील महिन्यात एका कार्यक्रमा दरम्यान काळोखे यांनी येथील वयोवृद्धांची सेवा घडावी या उद्देशाने आश्रमाची गरज ओळखून एक सांस्कृतिक भवन बांधून देण्याचे जाहीर केले होते. एक महिन्याच्या कालावधीत हा हॉल बांधून पूर्ण करण्यात आला. त्याचा उद्घाटन समारंभ नुकताच काळोखे यांच्या मातोश्री आदर्श माता फुलाबाई बबनराव काळोखे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब काशीद व ज्ञानेश्वर पुंडे यांच्या शुभहस्ते उद्योजक विलासराव काळोखे, सत्यवान बाळसराफ, मनोज छाजेड, नितीन हांडे, बाळासाहेब खिल्लारी, संग्राम जगताप या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नारायणराव काळोखे नागरी सहकारी पत संस्थेचे सचिव विश्वनाथ काळोखे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगांव सिटीचे अध्यक्ष केशव मोहोळ-पाटील आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र दिनाचे औचित्त्य साधून विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणा-या गुणवंत कामगार व उद्योजकांचा सन्मान राजाराम पाटील आश्रमाच्या वतीने करण्यात येतो. या ही वर्षी दि ५ मे रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना काळोखे म्हणाले, ” आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि आपण समाजातील अशा गोरगरीब लोकांना मदत केल्यास नक्कीच आपल्या या कामाची पावती समाज आपल्याला दिल्या शिवाय राहत नाही.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ.बी.आतार, प्रास्ताविक संदीप पानसरे, तर आभार एस.एन. गोपाळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.