Pimpri News : संचारबंदी लागू! काय सुरू, काय बंद; आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – राज्यात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 144 कलम लागू करण्यात आले आहेत.  1 मे 2021 च्या सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. याबाबतचे सुधारित आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

पिंपरी-चिंचवड संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.  वैद्यकीय आणि जीवनावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद असणार आहेत. घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस, नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवास करण्यास मुभा राहील.

या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार!

वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, पशु वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, शितगृहे आणि गोदाम सेवा,  सार्वजनिक वाहतूक टॅक्सी,रिक्षा, रेल्वे, विमानसेवा,  वेगवेगळ्या देशांची राजदूत कार्यालये, पूर्व पावसाळी नियोजित कामे सुरु राहतील, महापालिकेच्या सेवा, स्मार्ट सिटी, ड्रेनेज विषयक कामे, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा, शेती संबंधित सर्व कामे, कार्यालये, आयात-निर्यात, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, कुरिअर सेवा, आयटी सेवा सुरू राहणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शासकीय आणि खासगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस वितरण सेवा, एटीएम, पोस्टल सेवा, कच्चा माल, पॅकेजिंग साहित्याची निर्मिती, पुरवठा करणाऱ्या सेवा, मटण, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत.
तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट्स, बारवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम असून, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरू राहतील.  रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगी देण्यात आली असून, त्यांनीही पार्सल सेवा देता येणार आहे. नियमांचा भंग झाल्यास नागरिक, आस्थापना विरुद्ध 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशा बांधकांमाना परवानगी राहिल. रिक्षात चालक आणि दोन प्रवाशी, टॅक्सीत चालक आणि वाहनाच्या 50 टक्के क्षमतेएवढे प्रवासी, दुचाकीवर फक्त एकालाच परवानगी असणार आहे. लग्न समारंभास 25 लोक उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे.

हे बंद राहणार!

सिनेमागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, स्वीमिंग पूल, जिम, क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब संपूर्णतः बंद राहील. सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर्स, सार्वजनिक ठिकाणी, मोकळी मैदाने, उद्याने, धार्मिक स्थळे,  सलून, ब्यूटी पार्लर, बंद राहणार, सर्व शाळा, महाविद्यालये, परीक्षेसाठी मर्यादेत शिथिल केले जातील. ,खासगी क्लासेस, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.