Chinchwad : अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास

0

एमपीसी न्यूज – अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि अस्थापनांना पोलिसांकडून पास मिळणार आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात याची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पास मिळणार आहेत.

लॉकडाऊनच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ (आयुक्तालयाकरिता), पोलीस उपायुक्त स्मिता पाटील (परिमंडळ एक), पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे (परिमंडळ दोन) यांची इन्सीडन्ट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लॉकडाऊन असलेल्या कालावधीत अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरू राहणार आहे. त्यासाठी ज्यांना पास हवे आहेत, त्यांनी आपल्या आस्थापना ज्या हद्दीत आहेत, त्या पोलीस ठाण्यांच्या पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयातून आवश्यक कागदपत्रे जमा करून पास घ्यावेत, असे सांगण्यात आले आहेत.

पास मिळण्याची ठिकाणे –

#परिमंडळ एक – पोलीस उपायुक्त स्मिता पाटील
कार्यालय पत्ता – दुसरा मजला, प्रीमियर कंपनी शेजारी, जुना पुणे-मुंबई रस्ता, चिंचवड
संपर्क क्रमांक – 9834957526
ई-मेल – [email protected]
परिमंडळ हद्दीत येणारे पोलीस स्टेशन – पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी, निगडी, दिघी, चाकण, आळंदी पोलीस स्टेशन, म्हाळुंगे पोलीस चौकी

#परिमंडळ दोन – पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे
कार्यालय पत्ता – पहिला मजला, प्रीमियर कंपनी शेजारी, जुना पुणे-मुंबई रस्ता, चिंचवड
संपर्क क्रमांक – 9529861471
ई-मेल – [email protected]
परिमंडळ हद्दीत येणारे पोलीस स्टेशन – हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड, चिखली, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, रावेत, शिरगाव पोलीस चौकी

HB_POST_END_FTR-A2
You might also like