Chinchwad : टूरीस्ट कंपनीकडून ग्राहकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – विदेशी सहलीचे आमिष दाखवून चिंचवड येथील ‘सब देखो दुनिया टूर्स अन्ड ट्रॅव्हल्स’ या टूरीस्ट कंपनीने ग्राहकाला 55 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 25 जुलै 2019 ते 12 डिसेंबर या कालावधीत घडला आहे.

सुकुमार जयवंतराव आजगेकर (वय 51, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुकेश अहिरे (वय 30, रा. चिंचवड) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने सिंगापूर, मलेशिया, बाली या सहलीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 55 हजार रुपये घेतले. मात्र, फिर्यादीला सहलीला नेले नाही. सहलीला नेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. सुकुमार यांनी भरलेले पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे न देता त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.