BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : पैशाच्या वादातून शेजाऱ्यावर कटरने वार

एमपीसी न्यूज – तुमचा पती माझ्या पतीकडे वारंवार पैशाची मागणी करतो, अशी तक्रार शेजारी राहणाऱ्यांनी केली. यामुळे संतापलेल्या तरुणाने आपल्या शेजाऱ्यावर कटर ब्लेडने वार केले. ही घटना मोशी येथे शनिवारी (दि. 24) रात्री घडली.

अमोल हिरामण बाराडे (वय 33, रा. पंचशील क्‍लब शेजारी, बोराडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कल्याण वागंदरे (रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्याण हा फिर्यादी अमोल यांच्याकडे वारंवार पैसे मागत असे. याबाबतची तक्रार करण्यासाठी अमोल यांची पत्नी आरोपी कल्याण यांच्या पत्नीकडे गेली. काही वेळाने फिर्यादी अमोल हे आपल्या पत्नीस बोलविण्यासाठी आरोपी कल्याण यांच्या घरी गेले. तक्रारीमुळे संतापलेल्या आरोपी कल्याण याने कटर ब्लडने अमोर यांच्यावर वार केले. यामध्ये अमोल जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement