Pune News : ‘सायबेज खुशबू’ तर्फे विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, 25 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज – ‘सायबेज खुशबू’ तर्फे पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी देखील संस्थेने अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर केला आहे. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत, हे विद्यार्थी देखील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी 25 ऑक्टोबर अंतिम मुदत आहे.

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृती देण्यात येणार आहे. प्रामुख्याने अभियांत्रिकी, वैद्यकिय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी उदा. बीई, डिप्लोमा, बी.सी.ए, एम.सी.ए, बी.बी.ए, आर्किटेक्चर, फार्मसी, नर्सिंग, होमिओपॅथी, फिजिओथेरेपी, एम एस डब्लू, इ. शिक्षणासाठी आजपर्यंत ही संस्था शिष्यवृत्ती देते व यंदाच्या वर्षीही देणार आहे.

संस्थेची माहिती देताना संचालिका रितू नथानी म्हणाल्या, ‘सायबेज खुशबू संस्थेचा असा विश्वास आहे की प्रतिभा समाजाच्या सर्व स्तरात आहे पण या प्रतिभेला योग्य संधी मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या वंचित परंतु होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे व त्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये असणारी विषमता दूर करणे हे सायबेज खुशबूचे उद्दीष्ट आहे. आर्थिक सहाय्याबरोबर सायबेजखुशबू संस्था आपल्या लाभार्थींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते.’

‘गेली बारा वर्षे सायबेज खुशबू विद्यार्थ्यांना मदत करत आहे व यावर्षी देखील हा शिष्यवृत्ती कार्यक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत 1,500 पेक्षा जास्त लाभार्थी संस्थेशी जोडले गेले आहेत. संस्थेने मदत केलेल्या काहींना Accenture, TCS, Crompton Greaves, HSBC अशा नामवंत कंपन्यानमधे नोकरी मिळाली आहे.’

अर्जदारांसाठी निकष :

ज्या विद्यार्थ्यांना 10 वी व 12 वी परिक्षेत 60 % पेक्षा अधिक गुण आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे असे पुणे व पिपरी चिंचवड शहरातील रहिवासी विद्यार्थी या शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकतात.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज ऑनलाईन भरावे लागणार आहेत. खालील लिंक वर जाऊन विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतात. http://www.cybagekhushboo.org

किंवा

खालील पत्त्यावर जाऊन देखील विद्यार्थी संस्थेच्या संपर्क केंद्रात हे अर्ज ऑनलाईन भरू शकतील :

Cybage Software Pvt. Ltd. – Survey No 13A/ 1+2+3/1, near Gold adlabs, in front of D-Mart, Kalyani Nagar, Pune 411014, +91 -20- 66044700, Ext: 6619

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत लिंक खुली राहणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

वैशाली जावळे: 772207739
सोनाली तांबे: 7038536948
मंदार पोफळे: 7722091231

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.