Cyber Crime: नेटक-यांनो ! मोफत चित्रपट, वेब सिरीज पाहताय; मग सावधान !

Cyber ​​crime: net users! Watching free movies, web series; Then beware! शक्यतो अधिकृत व खात्रीलायक वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट, वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या वापरकर्त्याच्या नकळत एखादे मालवेअर (malware) डाऊनलोड होते. ते कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यांना पाठवते

त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.

मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा. जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डाउनलोड केली असेल व ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी (permission) मागत असेल तर अशी परवानगी देऊ नका. ती फाईल तात्काळ डिलीट करा.

शक्यतो अधिकृत व खात्रीलायक वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like