Cyber Crime: ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताय, काळजी घ्या; महाराष्ट्र सायबरचे आवाहन

Cyber ​​Crime: When conducting financial transactions online, be careful; Maharashtra Cyber ​​Appeal सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक हे सर्वात सोपे टार्गेट असतात, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इंटरनेट बँकिंग व सोशल मीडिया वापरताना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

एमपीसी न्यूज- सध्याच्या काळात बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा बँकांचे व्यवहार प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्यापेक्षा इंटरनेट बँकिंगद्वारे करणे पसंत करीत आहेत. ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत असताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. नागरिकांनी प्रत्येक व्यवहाराच्या वेळी सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

ऑनलाइन आर्थिक व्यवहार सोबतच इंटरनेटचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर तसेच कोणत्याही संकेतस्थळावर (वेबसाईट) आपली व आपल्या बँक खात्यांची माहिती, डेबिट /क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये.

_MPC_DIR_MPU_II

बरेच ज्येष्ठ नागरिक सध्या फेसबुकचा वापर करायला पण शिकत आहेत. आपल्या परिचयातील जुन्या व्यक्तींना फेसबुकवर शोधून ऍड करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर स्वतःची सर्व माहिती देणे टाळावे.

तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक हे सर्वात सोपे टार्गेट असतात, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इंटरनेट बँकिंग व सोशल मीडिया वापरताना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन आर्थिक किंवा अन्य कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही (वेबसाईट) द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.